वै. देशमुख दिंडी, पुणे

महाराजांविषयी ...

वै. ह. भ. प. केशवराव महाराज देशमुख

जन्म : पौष वद्य १० शके १७९८, निर्वाण : वैशाख शु ११ शके १८६४

एम. ए. साठी ' ज्ञानेश्वरी' हा खास विषय घेतला आणि महाराजांचे जीवन बदलून गेले, अशाप्रकारे पुण्यभूमीला एक निष्ठावान वारकरी मिळाला. संतांच्या चरित्राचे एक वैशिष्टय असते.त्यात अंगकाठी,पोशाख, आवडीचे पदार्थ, वैवाहिक जीवन , राहणीमान याला फारशी किंमत नसते.त्यांचा अध्यात्माचा अधिकार, त्यांची ग्रंथ संपदा , त्यांची साधना, त्यांचे आचरण, त्यांची समाजसेवा, त्यांनी केलेले गुरु , त्यांचे सोबती या सर्वांवरून त्यांचे श्रेष्ठत्व ठरते.या सर्व गुणांमुळेच वै. देशमुख महाराज त्यांच्या काळात पुण्यातील एक प्रभावी व्यक्ती म्हणून मान्यता पावले

संस्थेविषयी...

वै. देशमुख महाराज दिंडी व समाधी विश्वस्त संस्था

नोंदणी क्र. इ. ७३८/ ३१-१-१९८१

प्रत्यक्षात ही दिंडी १९२१ पासून सुरु झालेली असली तरी १९८१ साली धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली. प्र . का. सोमण, हसबनीस, पु. रा दिवेकर , पु.ग साठे , ग. य. नातू , दादा घाणेकर, अजित कुलकर्णी, ल. क. देशपांडे असे दिंडीचे पदाधिकारी राहिलेले आहेत व दिंडीच्या वृद्धीसाठी यांचे मोलाचे सहकार्य संस्थेला लाभले आहे. संपूर्ण आषाढी वारी मध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या दिंडीपैकी ही एक दिंडी आहे. तसेच ह.भ.प. अण्णा घाणेकर यांनी अनेक वर्ष दिंडी व केशवराव महाराज देशमुख यांचा पुण्यतिथी उत्सव काळात प्रवचन , कीर्तन सेवा केलेली आहे.

विश्वस्त मंडळ

नावसंपर्क
लिमये श्रीकांत(अध्यक्ष)+91-9260270280
देवळणकर राजाभाऊ +91-9765036153
रकटे विलास +91-9890247307

आषाढी वारी सन 2019 नोंदणी / Ashadhi Wari 2019 Time Table Schedule

वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.
" अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात."
वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
No posts.
No posts.

Our Bank Details

Indian Bank - Sadashiv Peth, Pune Branch

A/C: 716156525

Name: Deshmukh Dindi, Pune

IFSC: IDIB000S001

वै. महाराजांची ग्रंथ संपदा


श्री अमृतानुभव , श्री चांगदेव पासष्टी , श्री ज्ञानेश्वर हरिपाठ


श्री नारद भक्तिसूत्रे - वै. देशमुख महाराज

Tagged Under: Ashadhi Wari, Alandi Pandharpur Dindi, Ashadhi Vari

SEND US A MESSAGE